अकोले (नगर) येथील आदिवासी भागांतील ७६ गावांत ‘एक गाव, एक गणपति’ !

  • प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साहाय्य करणार्‍या अकोले (नगर) येथील भक्तांचे अभिनंदन ! सणांच्या वेळी प्रशासनाला साहाय्य करण्याच्या घटना हिंदूंच्या बाबतीतच ऐकायला मिळतात, हे लक्षात ठेवा. – संपादक 
  • ‘एक गाव, एक गणपति’ ही संकल्पना राज्यस्तरावर राबवण्यासाठी प्रयत्न हवेत ! – संपादक

अकोले (नगर), १४ सप्टेंबर – राजूर (ता. अकोले) गावात गतवर्षी १९ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. यंदा केवळ ४ गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती स्थापन केली आहे, तसेच राजूरसह चाळीस गाव डांग आदिवासी भागातील ७६ गावांत ‘एक गाव, एक गणपति’ हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती राजूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येक गावाने प्रशासनाला साहाय्य करण्याचे ठरवले होते. या वर्षी गणेशोत्सव मंडळांनी गावात स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.