साकीनाका येथील महिलेवर अत्याचार प्रकरणाचा उलगडा

सिसिटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मोहन चौहान

मुंबई – साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील महिला आणि आरोपी हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. तसेच त्यांच्यातील देवाण-घेवाणीच्या वादातून आरोपीने या महिलेवर अत्याचार करून अमानुषपणे त्यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. आरोपी मोहन चौहान याने चौकशीत गुन्ह्याची माहिती दिली आहे. आरोपीच्या विरोधात मुंबईत कोणताही गुन्हा नोंद नाही. त्याच्यावर अन्य राज्यात गुन्हे आहेत का ? याची माहिती घेण्याचे काम चालू आहे. हा खटला चालवण्यासाठी राज्य सरकारने अधिवक्ता राजा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे.