हिंदूंच्या परिणामकारक संघटनाने लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

अमरावती – आतापर्यंतच्या हिंदु स्त्रियांनी नैतिकता आणि संस्कृती यांचा मौल्यवान ठेवा जपला आहे; मात्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रेमविवाहाच्या गोंडस नावाखाली हिंदु स्त्रियांचा भोगवस्तू म्हणून वापर करणे आणि इस्लामी वंशवृद्धीचा मार्ग अवलंबणे, हाच लव्ह जिहादचा उद्देश आहे. त्यामुळे हिंदु धर्माचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी मुलींना लहानपणापासूनच नीतीमूल्ये शिकवण्यासह धर्मशिक्षण द्यायला हवे. याचसमवेत हिंदूंचे परिणामकारक संघटन झाल्यास लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील धर्मप्रेमी हिंदूंसाठी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री. घनवट यांनी ‘माझ्या परिचयाची एकही मुलगी लव्ह जिहादला बळी पडणार नाही, असा निश्चय करूया’, असे आवाहनही धर्माभिमानी हिंदूंना केले.

या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. शबरी देशमुख यांनी सांगितला.

जिज्ञासूंचे अभिप्राय

१. श्री. योगेश दुधे – पुष्कळ मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचे षड्यंत्र रचले जात आहे. याविरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.

२. श्री. कार्तिक कौरासे – लव्ह जिहादला पाठिंबा देणारे मंत्री राज्यात आहेत, हे हिंदूंचे दुर्दैव !

३. शीतल शर्मा – मुलींना स्वरक्षणाचे धडे मिळायला हवेत. (हिंदु जनजागृती समिती विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण देत आहे. – संपादक)

४. ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर – लव्ह जिहादविषयी सरकार गंभीर नाही आणि मुलींच्या पालकांची मानसिकता खचलेली आहे.

लव्ह जिहादमध्ये फसवलेल्या तरुणींचे वशीकरण नामजपादी उपायाने नष्ट करा ! – सुनील घनवट

फसव्या प्रेमाचा आधार घेऊन जगभर इस्लामेतरांविरुद्ध पुकारलेले हे युद्ध आहे. या युद्धामध्ये वशीकरण हा प्रमुख घटक आहे. गंडे, दोरे, ताईत या माध्यमांतून वशीकरण केले जाते. त्यावर उपाय म्हणजे सर्वप्रथम तरुणीला बांधलेले गंडे-दोरे किंवा ताईत अग्नीविसर्जित करावे. गोमूत्र शिंपडून तरुणीची शुद्धी करावी आणि नारळाने तिची दृष्ट काढावी. त्यानंतर मुलीच्या डोक्यावर हात ठेवून १ घंटा कुलदेवीचा नामजप करावा. अशा नामजपादी उपायाने वशीकरण नष्ट होते.