रत्नागिरीतील मूर्तीकार आशिष संसारे यांनी ऑलिंपिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा यांच्या रूपातील श्री गणेशमूर्ती साकारून श्री गणेशाचे केले मानवीकरण !

  • हिंदूंनो, श्री गणेशाची तुलना कोणताही नेता, सैनिक, खेळाडू यांच्याशी करता येत नाही. उथळ लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी श्री गणेशमूर्ती आहे का ? – संपादक
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते देवतांचे मानवीकरण करतात ! अशी धर्मशास्त्रविसंगत श्री गणेशमूर्ती बनवल्याने श्री गणेशाची कृपा नाही, तर अवकृपाच होईल, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • श्री गणेशाची कृपा होण्यासाठी श्री गणेशमूर्ती चित्र-विचित्र आकारात नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार साकारली, तर त्याचा आध्यात्मिक लाभ मूर्तीकाराला, तसेच ती पूजणार्‍यालाही होतो. – संपादक
नीरज चोप्राच्या रुपातील श्री गणेशमूर्ती

रत्नागिरी – ऑलिंपिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा यांच्या रूपातील श्री गणेशमूर्ती रत्नागिरीतील मूर्तीकार आशिष संसारे यांनी साकारली. ही श्री गणेशमूर्ती मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्यासाठी साकारण्यात आली.

माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख हे हौशी असून प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रकारची श्री गणेशमूर्ती साकारण्याची त्यांना आवड आहे. ‘यावर्षी सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राच्या स्वरूपात श्री गणेशमूर्ती साकारावी, अशी संकल्पना त्यांनी मूर्तीकार आशिष संसारे यांना सांगितली. त्यानुसार मूर्तीकार संसारे यांनी निरजच्या स्वरूपातील भालाफेक करतांना श्री गणेशमूर्ती साकारली आहे. ही गणेशमूर्ती शाडू मातीतील असून दीड फूट उंचीची आहे.

(बाजूला दिलेले छायाचित्र छापण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून लोकांचे प्रबोधन करणे हा आहे. देवतांचे मानवीकरण कसे केले जाते, ते समजावे म्हणून हे छायाचित्र छापत आहोत ! – संपादक)