वणी (यवतमाळ) तालुक्यात डेंग्यू आणि तत्सम आजारांत पुष्कळ वाढ

वणी (यवतमाळ), १९ सप्टेंबर (वार्ता.) – तालुक्यात डेंग्यू आणि तत्सम आजारांत वाढ झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. तालुक्यात आरोग्य कर्मचारी अल्प आहेत आणि नियोजनाच्या अभावी एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली आहे. आरोग्य अधिकार्‍यांची स्थानांतराची (बदली) प्रकरणे, रुजू न होणे अशा कर्मचार्‍यांच्या समस्यांमुळे आरोग्य विभागाची स्थिती सक्षम नाही; मात्र त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.