‘इस्कॉन’चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२५ रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध !

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पोलीस अधिकारी हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

गुजरातमधील १२ व्या शतकातील प्राचीन गलतेश्वर महादेव मंदिराचा जिर्णाेद्धार

मंदिराचे व्यवस्थापक रामदेस महाराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या जिर्णाेद्धारासाठी अनुमती दिली होती.

देशात सर्वाधिक पाऊस कोयना विभागात, चेरापुंजीलाही टाकले मागे !

वर्ष २०२१ मधील पावसाने नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. महाबळेश्वरला मागे टाकत नवजा आणि वलवण पाणलोट क्षेत्रात १०० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे या क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे.

मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा यांच्या व्यवस्थापनासाठी एकसमान कायदा बनवावा !  

सर्वोच्च न्यायालयात भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

येत्या ३ वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, अन्यथा स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक यांना तंबी !

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन हौदांवर लाखो रुपयांचा खर्च !

महापालिकेने ११ दिवसांसाठी हौद घेतले असून त्यासाठी १ कोटी २६ लाख १९ सहस्त्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर विसर्जनाचा खर्च ४६ लाख रुपये इतका होता.

धारूर (जिल्हा बीड) ग्रामपंचायत उपसरपंचाने पंचायत समितीत केला आत्मदहनाचा प्रयत्न !

आत्मदहनाच्या वेळी काही अनर्थ झाला असता, तर याचे दायित्व कोण घेणार होते ?

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ! – भाजपच्या किरीट सोमय्या यांचा आरोप

हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीच्या खात्यात ‘सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या’चे ३ लाख ७८ सहस्र ३४० रुपयांचे शेअर्स दाखवण्यात आले आहेत.

गोव्यात कोरोना लसीची पहिली मात्रा घेण्याचे प्रमाण १०० टक्के नसल्याचे उघड !

१२ सप्टेंबरला १ सहस्र ५२ जणांनी घेतली कोरोना लसीची पहिली मात्रा