‘इस्कॉन’चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२५ रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध !

नवी देहली – ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा काँशियसनेस (इस्कॉन)’चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२५ रुपयांचे विशेष नाणे नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि १२५ रुपये असे लिहिले असून दुसर्‍या बाजूला स्वामी प्रभुपाद यांची प्रतिमा आहे. विशिष्ट महापुरुषांच्या सन्मानार्थ विशेष नाणे प्रसिद्ध केले जाते. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त १२५ रुपयांचे नाणे प्रसिद्ध केले होते. नागरिकांना अशी नाणी खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने ठरवलेले मूल्य द्यावे लागते. त्यासाठी आगाऊ नोंदणी करून https://www.spmcil.com/Interface/Home.aspx या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो.