जम्मू-काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेला आतंकवादी बुरहान वानी याच्या वडिलांनी केले ध्वजारोहण !

आतंकवाद्यांच्या वडिलांनी ध्वजारोहण करण्याच्या वृत्ताला नाहक प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांनी ध्वजारोहण केल्याचे वृत्त का दाखवत नाहीत ?

  • अशा प्रकारची वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यावर लोकांना आतंकवाद्यांच्या कुटुंबियांविषयी सहानुभूती निर्माण होते. कुठल्या वृत्तांना किती प्रसिद्धी द्यायची, याचेही तारतम्य नसणारी प्रसारमाध्यमे जनताद्रोहीच होत !
  • बुरहान वानी याच्या वडिलांना त्यांच्या मुलाने केलेल्या कारवाया मान्य आहेत का ? बुराहान वानी याच्यामुळे काश्मीरमधील अनेक तरुण आतंकवादी बनले. मुलाच्या या कारवायांविषयी बुरहान वानी याच्या वडिलांनी कधी देशाची क्षमा मागितली का ?
(डावीकडे) ठार करण्यात आलेला आतंकवादी बुरहान वानी (उजवीकडे) त्याचे वडील मुझफ्फर वानी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये जुलै २०१६ मध्ये हिजबूल मुजाहिदीनच्या बुरहान वानी या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी ठार केले होते. यानंतर दक्षिण काश्मीमरमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली होती. वानी याच्या समर्थनार्थ आणि सुरक्षादलांचा विरोध करण्यासाठी धर्मांधांनी ५ मास हिंसक आंदोलन केले. त्यात जवळपास १०० लोकांना जीव गमावला लागला, तर सहस्रो लोक घायाळ झाले होते. याच बुरहान वानीचे वडील मुझफ्फर वानी यांनी पुलवामामधील त्राल येथील उच्च माध्यमिक शाळेत १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.