केंद्रातील भाजप सरकारने सरसंघचालकांच्या या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !
मुंबई – आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करत असलो, तरी त्यांचे मूळ भारतात नाही, तर बाहेरून आलेले आहे. आम्ही चीनच्या विरोधात कितीही ओरड केली, तरी आपल्या भ्रमणभाषमध्ये ज्या वस्तू आहेत, त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागणार, तोपर्यंत चीनच्या पुढे झुकावे लागेल, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथील आय.ई.एस्. राजा शिवाजी शाळेत ध्वजारोहण करतांना केले.
इंटरनेट और तकनीक का जिक्र करते हुए संघ प्रमुख मोहन भागवत ने चीन को लेकर कही ये बात #MohanBhagwat #Chinahttps://t.co/RldFejNKuJ
— ABP News (@ABPNews) August 15, 2021