तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारची शरणागती !

सत्ता हस्तांतरण होणार

तालिबानी आतंकवादी

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये घुसण्यास चालू केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी त्यागपत्र दिल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे. तालिबानमधील दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर हा राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासमवेत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली याच्याकडे राष्ट्रपती गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.