पू. रमानंद गौडा यांच्या पायाखाली ठेवलेले आसन साधिकेने जवळ घेतल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्पर्श’ झाल्याचे वाटून येणे

पू. रमानंद गौडा

‘मी मंगळुरू येथील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसले असतांना माझ्या मनात ‘माझ्याकडून साधनेचे अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत’, असे नकारात्मक विचार आले. तेवढ्यात पू. रमानंदअण्णा (पू. रमानंद गौडा) नामजपादी उपाय संपवून त्यांच्या पायाखाली ठेवलेले आसन ठेवण्यासाठी उठले. मी त्यांच्या हातातून ते आसन घेतले. पू. अण्णा त्यांच्या कक्षात गेल्यावर ते आसन मी माझ्या जवळ घेतले. त्याच क्षणी माझ्या मनातील नकारात्मक विचार थांबून नामजपाला प्रारंभ झाला. मला उत्साह वाटू लागला आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या आसनाला स्पर्श केला आहे’, असा विचार मनात येऊन माझी भावजागृती झाली. संतांच्या माध्यमातून साधनेचे सातत्याने प्रयत्न करवून घेणार्‍या आणि संतांच्या रूपातून गुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

– सौ. भव्या गौडा, मंगळुरू, कर्नाटक. (११.७.२०१९)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक