कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अजूनही कोरोनाबाधित ४५ रुग्णांची स्थिती गंभीर आहे आणि असे रुग्ण प्रत्येक दिवशी भरती होत आहेत.

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस !

३१ ऑगस्ट या दिवशी परब यांना ईडीच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलावी ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

कोरोनाची तिसरी लाट पसरू नये, यासाठी विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटात जनआशीर्वाद यात्रा काढणे जनतेसाठी धोकादायक ! – दीपक केसरकर, आमदार, शिवसेना

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या दृष्टीने ‘रेड झोन’मध्ये आहे. अशा कोरोनाच्या संकटकाळात जनआशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

वादग्रस्त ‘भूमीपुत्र अधिकारिणी विधेयका’चा कायदा विभाग अभ्यास करणार

हे विधेयक शासनाने नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांचा तीव्र विरोध डावलून संमत केले होते.

एस्.टी. महामंडळाला ३ सप्टेंबरपर्यंत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश !

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली, तरी प्रवाशांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे एस्.टी.ला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र आणि शिवप्रेमी यांची क्षमा मागावी !’ – संभाजी ब्रिगेड

‘छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले’, या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचे प्रकरण

सावंतवाडी आणि देवगड येथे भाजप आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका

प्रशासनाच्या मनाई आदेशाचा भंग करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचे आयोजन केल्याच्या प्रकरणी सावंतवाडीत काही जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी भारतीय वाद्यांच्या आवाजात ‘हॉर्न’ वाजणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘ध्वनीप्रदूषण जागरूकता अभियाना’चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.