
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन भाजपने जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलावी, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केले आहे. याविषयी २८ ऑगस्ट या दिवशी श्री. अजय सेंगर यांनी भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे पत्र दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट पसरू नये, यासाठी विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी या पत्रात केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी टाकणे आवश्यक आहे. यासाठी कडक शिक्षा वा आर्थिक दंड करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी केले आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.