सावंतवाडी आणि देवगड येथे भाजप आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका

प्रातिनिधिक छायाचित्र

सावंतवाडी – प्रशासनाच्या मनाई आदेशाचा भंग करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचे आयोजन केल्याच्या प्रकरणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावले यांच्या विरोधात, तर कोलगाव येथे सभा आयोजित केल्याच्या प्रकरणी भाजपचे जिल्हा केंद्र संयोजक महेश सारंग, सरपंच संतोष राऊळ यांच्यासह ३४ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी गर्दी करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी देवगड पोलिसांनी भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सभापती लक्ष्मण उपाख्य रवि पाळेकर यांच्यासह १० जणांच्या  विरोधात, तर जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी येथील शिवसेना शाखेसमोर एकत्र येत घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संदेश पारकर, उपतालुकाप्रमुख बुवा तारी यांच्यासह १० जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.