मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. ३१ ऑगस्ट या दिवशी परब यांना ईडीच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचे सांगण्यात आले आहे. याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे म्हटले, ‘‘शाब्बास ! जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू. जय महाराष्ट्र !’’
भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख, आता अनिल परब आणि पुढचा नंबर राष्ट्र्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा असेल.