अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सर्व सैनिक माघारी फिरले !

तालिबानकडून आनंदोत्सव साजरा !

काबुल – अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेले अमेरिकेचे सर्व सैनिक माघारी फिरले आहेत. ‘अमेरिकेचे सर्व सैनिक ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून माघारी फिरतील’, असे अमेरिकेने आश्वासन दिले होते. त्याची अमेरिकेने पूर्तता केली. त्यामुळे आता अफगाणिस्तान पूर्णपणे (पंजशीर प्रांत वगळता) तालिबानच्या कह्यात गेला आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. अमेरिकेचे सैन्य १९ वर्षे, १० मास आणि १० दिवस अफगाणिस्तानमध्ये तैनात होते.