कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच मिरवणुकीचे आयोजन
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – शहरामध्ये श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध चित्ररथही होते. या मिरवणुकीत हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कलम ३७० हटवल्यानंतर हिंदूंनी प्रथमच श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात लाल चौकात मिरवणूक काढली. या वेळी सुरक्षादलांकडून संरक्षण देण्यात आले होते. शहरातील हब्बा कदल भागातून निघालेली ही मिरवणूक गणपतियार मंदिर मार्गे लाल चौकात पोचली आणि नंतर ती पुन्हा मंदिराकडे परतली. मिरवणुकीमध्ये पुरुष, महिला आणि मुले यांनी सहभाग घेतला होता. मिरवणुकीत नृत्यही केले जात होते, तसेच लोकांना मिठाईही वाटली जात होती.
#Janmashtami procession taken out in #Srinagar after 32 years, #KashmiriPandits rejoiced as jhanki yatra crossed #LalChowkhttps://t.co/dfc0wuFu2X
— Zee News English (@ZeeNewsEnglish) August 31, 2021