सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधिशांनी घेतली एकाच वेळी शपथ !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी एकाच वेळी ९ न्यायाधिशांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश म्हणून शपथ दिली. प्रथमच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला. या ९ न्यायाधिशांमध्ये ३ महिला न्यायाधिशांचा समावेश आहे. हा शपथ सोहळा सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.  श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्रकुमार माहेश्‍वरी, हिमा कोहली, बी.व्ही. नागरत्ना, सीटी रविकुमार, एम्.एम्. सुंदरेश, बेला एम्. त्रिवेदी आणि पी.एस्. नरसिंहा या न्यायाधिशांनी शपथ घेतली. आता सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधिशांची संख्या ३३ झाली असली, तरी अद्याप एक जागा रिक्तच आहे.