पुष्कळ पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा परिणाम झाला नाही ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

संभाजीनगर येथे अपघातातील घायाळ कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवल्या मद्याच्या पेट्या !

कंटनेरमध्ये एकूण १ सहस्र ८०० मद्याच्या पेट्या होत्या. या वेळी मद्याची पेटी पळवणार्‍या एकाही नागरिकाने कंटेनरच्या घायाळ चालकाकडे लक्ष दिले नाही

पंडित नेहरू यांच्या ‘शांतीदूत’ धोरणामुळे देश कमकुवत बनला ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

मी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, तसेच कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

सोलापूर येथे ‘बकरी ईद’च्या दिवशी २ मशिदी उघडल्याने १४ धर्मांधांवर गुन्हा नोंद

बाबा कादरी मशीदचे पदाधिकारी जब्बार महिबुबसाब शेख, सत्तार मोदीनसाब शेख, अकील अहमद युसूफ शेख यांसह ८ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला

जायकवाडी धरणात मुबलक पाणी असतांनाही संभाजीनगर शहरात पाण्याची टंचाई !

शहराला काही ठिकाणी ५, तर काही ठिकाणी ८ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही नागरिकांना टँकरचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.

महाराष्ट्राने मोठे केलेल्या धनिकांनी पूरग्रस्तांना साहाय्य करण्याची दिलदारी दाखवावी ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

‘‘कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे, हे संकट गंभीर आहे. अशा परिस्थितीत खचलेल्या मनाला उभारी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: फिरून सर्वांना धीर देत आहेत.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही मुंबईमधील ३ लोकप्रतिनिधी घेत आहेत नगरसेवकपदाचेही मानधन !

जनतेच्या पैशाचा अपव्यय करणारे राजकारणी स्वत:च्या खिशातील पैशांचा असा अपव्यय होऊ देतील का ?

खुनी काँग्रेसला शिक्षा हवी !

‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारले, तर ते क्षम्य आहे’, असे कधीही म्हणता येणार नाही, हे महाराष्ट्रातील प्रबुद्ध पत्रकारांना ठाऊक असणारच. विक्रम संपत यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हा इतिहास जनतेला ठाऊक झाला पाहिजे.

नक्षत्रांचे देणे !

अभ्यासक्रमांत प्राचीन भारतीय शास्त्राचा समावेश करायला हवा. तसेच जे अभ्यासक या शास्त्रासाठी योगदान देत आहेत, त्यांचा उचित सन्मान करायला हवा. विरोध करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आवर घालायला हवा. राष्ट्रहितासाठी हे आवश्यक आहे !

परात्पर गुरुदेवांचा आदर्श समोर ठेवून ईश्वरी कार्यात सहभागी व्हा ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.