उपमुख्यमंत्र्यांकडून सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पहाणी

सांगली – कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह येथील स्टेशन चौकातील पूरस्थितीची पहाणी करतांना ते बोलत होते. या वेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांना नकाशाद्वारे परिस्थितीची माहिती दिली. अजित पवार यांनी पलूस येथून त्यांच्या दौर्याला प्रारंभ केला. त्यानंतर सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन त्यांनी सांगली शहरातील महापुराची पहाणी केली.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !