सोलापूर येथे ‘बकरी ईद’च्या दिवशी २ मशिदी उघडल्याने १४ धर्मांधांवर गुन्हा नोंद

सोलापूर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत, तसेच जमावबंदी आदेश लागू असूनही त्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी येथील २ मशिदींवरील एकूण १४ ‘ट्रस्टी’ आणि पदाधिकारी यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बकरी ईदच्या निमित्ताने मशीद उघडली, तसेच गर्दीमध्ये सामाजिक अंतर पाळले नाही, ‘मास्क’ लावला नाही, मशिदीमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला, या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (कोरोना संसर्गाविषयी कठोर निर्बंध असूनही त्याचे बिनदिक्कतपणे उल्लंघन करणार्‍या धर्मांधांवर केवळ गुन्हा नोंद न करता प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते. – संपादक)

बाबा कादरी मशीदचे पदाधिकारी जब्बार महिबुबसाब शेख, सत्तार मोदीनसाब शेख, अकील अहमद युसूफ शेख यांसह ८ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून मक्का मशीद येथील रहिम कामले, हमीद वहाब महाडिक ईस्ताक कमरोद्दीन शाहाजी यांच्यासह ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.