‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

 ‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भौतिक विकासासह आत्मिक विकास केला, तरच मनुष्य यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आपत्कालीन स्थितीत मन सकारात्मक ठेवण्यासाठी ‘ऑनलाईन श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

केंद्रसरकारच्या आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित मृतांची संख्या ११ सहस्र ६१७ ने अल्प !

राज्यात रुग्णांची संख्या लपवली जात आहे का ? याविषयी प्रश्‍नचिन्ह

मुंबईत दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. २ किलो २०० ग्रॅम वजनाचे हे अमली पदार्थ आहेत.

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायद्यासाठी अभियान आरंभण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

हिंदु राष्ट्राचा अखंड ध्यास असलेले डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे ९३ वे संत पू. बन्सीधर तावडे आजोबा (वय ८१ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. तावडेआजोबा हे वर्ष १९९७ पासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती, तर १८ मे २०१९ या दिवशी त्यांनी संतपद गाठले. त्यांनी तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा केली.

अखंड भावावस्थेत असणारे ठाणे येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

वर्ष २०१७ ते वर्ष २०२१ या काळात पू. सदाशिव सामंतआजोबा हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. ९ ऑगस्ट २०१९ या दिवशी पू. सामंतआजोबा संतपदी विराजमान झाले होते. आश्रमात ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करत.

सनातनची युवा साधिका कु. निधी शंभू गवारे हिचा ‘कलोत्सव २०२१’ यामध्ये सादर केलेल्या नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक !

‘नेस्पा’ आणि ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थी संघटना’ यांनी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘कलोत्सव २०२१’ मध्ये सनातनची युवा साधिका कु. निधी गवारे हिने नृत्य प्रकारात सहभाग घेतला होता.

नवनीत राणा यांची खासदारकी रहित करण्याची न्यायालयात मागणी करणार ! – अधिवक्ता राघव कवीमंडन

अपक्ष खासदार नवनीत राणा कौर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी एक याचिका अमरावती येथील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट केली आहे.

मालाड (मुंबई) येथे इमारत कोसळून ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू, ७ जण घायाळ !

मालाड येथील दुर्घटनेतील घायाळ व्यक्तींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित