सनातनची युवा साधिका कु. निधी शंभू गवारे हिचा ‘कलोत्सव २०२१’ यामध्ये सादर केलेल्या नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक !

कु. निधी गवारे

पुणे – ‘नेस्पा’ आणि ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थी संघटना’ यांनी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘कलोत्सव २०२१’ मध्ये सनातनची युवा साधिका कु. निधी गवारे हिने नृत्य प्रकारात सहभाग घेतला होता.

कु. निधी हिने नृत्य प्रकारात ‘सेमी क्लासिकल’ अर्थात् अर्धशास्त्रीय नृत्य प्रकाराचे सादरीकरण केले. यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आला आहे.

कु. निधी हिने तिला मिळालेले हे यश ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने मिळाले आहे’, असे सांगून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच तिने असेही म्हटले आहे की, या यशात ‘सूक्ष्मी कथ्थक नृत्यालया’च्या नृत्य शिक्षिका सौ. सुनीता जमदाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले; म्हणूनच हे यश मिळू शकले. कु. निधी हिचे वडील श्री. शंभू गवारे हे सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक आहेत आणि आई सौ. रूपाली याही संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत.