मुंबईत दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

मुंबई – अमली पदार्थ नियंत्रक विभागाने मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. २ किलो २०० ग्रॅम वजनाचे हे अमली पदार्थ आहेत. ते अमेरिकेतून भारतात आणले होते. तसेच या पदार्थांच्या खोक्यावर ‘आपत्कालीन अन्न (इमर्जन्सी फूड)’ असा उल्लेख आहे. हे कुणी पाठवले ? याचे अन्वेषण चालू आहे.