पू. बन्सीधर तावडेआजोबा यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी काढलेले गौरवोद्गार !
‘अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्ती असलेले डिगस, सिंधुदुर्ग येथील पू. बन्सीधर तावडे यांनी सनातनचे ग्रंथ, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्या वाचनातून अध्यात्म समजून घेतले अन् ते त्वरित कृतीतही आणले. अध्यात्माची आवड असल्याने नाम, सत्संग, सेवा आणि तन, मन अन् धन यांचा त्याग अशा टप्प्यांनी त्यांनी साधनेची सर्व तत्त्वे अंगीकारली.