केंद्रसरकारच्या आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित मृतांची संख्या ११ सहस्र ६१७ ने अल्प !

राज्यात रुग्णांची संख्या लपवली जात आहे का ? याविषयी प्रश्‍नचिन्ह

मुंबई – देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या संख्येच्या तुलनेत केंद्र सरकारने दिलेली संख्या ११ सहस्र ६१७ ने अधिक आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या लपवली जात आहे का ? याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार अक्कलकोटमधील हंजगी या गावात एप्रिल मासात कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र प्रत्यक्षात तेथे ८ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत, तर केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार हंजगी गावात कोरोनामुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या ९ जून या दिवसाच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १ लाख १ सहस्र ८३३ इतकी आहे.