

सांगली, २७ मे (वार्ता.) – टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने चांदणी चौक परिसरातील गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, गोडे तेल, साखर, चहा पावडर, मीठ अशा साहित्याचा समावेश आहे. या वेळी शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेचे शहराध्यक्ष शितल थोरवे यांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजचे वाटपही करण्यात आले.
या प्रसंगी टी.बी. लुल्ला चारिटेबल फौंडेशनचे अध्यक्ष अधिवक्ता किशोर लुल्ला, श्री. अमित लुल्ला, सौ. गुंजन लुल्ला, श्री. अमेय जोशी, शिवसेनेचे उपसरपंच श्री. भगवानदास केंगार, सर्वश्री गणेश पाटील, विजय पाटील, शंभूराज केंगार, विराज केंगार यांसह अन्य उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !