अनावश्यक रस्त्यावरून फिरल्यास १४ दिवस रहावे लागणार विलगीकरणात !

मलकापूर (जिल्हा सातारा) नगरपालिकेचा निर्णय

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कराड – येथील मलकापूर नगरपालिकेने जिल्ह्याधिकार्‍यांच्या आदेशावर कडक कार्यवाही करण्यासाठी शहरात ९ ठिकाणी तपासणी नाके सिद्ध केले आहेत. शहरातील दाट वस्ती असणार्‍या भागांतील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आता अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय सर्व प्रभाग अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.

या वेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, ‘‘कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी १ जूनपर्यंत कडक दळणवळण बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.’’