‘म्युकरमायकोसिस’चे सोलापूर जिल्ह्यात ७५ रुग्ण आढळले

सोलापूर – कोरोनातून बरे झाल्यानंतर एका सप्ताहात काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लागण होत असल्याचे समोर येत आहे. मागील एक मासात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ७५ रुग्ण आढळले असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली. सध्या सोलापूर शासकीय रुग्णालयात अशा १४ रुग्णांवर उपचार चालू आहेत, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.