खतांच्या दरवाढीच्या विरोधात सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

सोलापूर – येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खतांच्या दरवाढीच्या विरोधात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी काही मुख्य पदाधिकार्‍यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. या वेळी सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमांचे कार्यकर्त्यांकडून उल्लंघन करण्यात आले होते. (कोरोनाचा संसर्ग वाढलेला असूनही आंदोलनांमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या कार्यकर्त्यांवर प्रशासन कारवाई करणार का ? – संपादक)