पुणे येथील मंदिरातून दानपेटीसह दीड लाख रुपयांची चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

पुणे, १८ मे – येथील गुरुवार पेठ परिसरात असलेल्या श्री आदेश्‍वर महाराज मंदिर ट्रस्टच्या गोटीवालाधडा या मंदिरामधील नाकोडा भैरव जैन मंदिरातून १६ मेच्या रात्री २ चोरांनी दानपेटीसह १ लाख ५३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये मुद्रित झाली आहे. तेजपाल गोटीवाला यांनी या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चोरांनी मंदिराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजाचे कडी-कोयंडे तोडले. त्यानंतर दानपेटी बाहेर काढली. या घटनेचा तपास चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.