पुणे, १८ मे – रक्तचंदनाने भरलेला ट्रक ताथवडे येथे आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६ कोटी ५२ लाख ५४ सहस्र रुपयांचे रक्तचंदन जप्त केले आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली असून कह्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या भ्रमणभाषमध्ये रक्तचंदनाने भरलेल्या ट्रकचे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर शेअर केल्याचे आढळल्याने प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी नीलेश विलास ढेरंगे, एम्.ए सलीम, विनोद प्रकाश फर्नांडीस यांच्यासह एकूण ५ जणांना कह्यात घेण्यात आले असून इतर २ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
सापडलेल्या ट्रकमध्ये ६ टन ४२० किलो वजनाचे रक्तचंदनाचे ओंडके आढळले. चोरून आणलेले रक्तचंदन कोठून आणले आणि कोठे घेऊन जात होते, हे अद्याप तपासात उघड झाले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
Wakad Crime News : वाकड पोलिसांनी पकडले साडेसहा टन रक्तचंदन; रक्तचंदन तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडhttps://t.co/P8WrKwFQjY
— mpcnews.in (@PimpriChinchwad) May 17, 2021