सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड !

लोणावळा – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) यांनी धाड घातली.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालये येथे धाडी घालून मुंबई-ठाण्यातील ठिकाणांची झाडाझडती घेतली. बांधकाम क्षेत्र आणि निवासी संकुलाशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने, तसेच सरनाईक प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी या आस्थापनात परदेशी निधीचा अपहार झाल्याचा सक्तवसुली संचालनालयाला संशय आहे. सरनाईक यांच्या मुलाची ही काही व्यवहारांविषयी चौकशी केली होती. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक तुम्ही कुठे आहात ? असे ट्वीट केले होते. त्यानुसार सरनाईक यांना कह्यात घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.