अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी

भगवान परशुराम जयंतीनिमित्त महामृत्युंजय जपाची ठिकठिकाणी सामूहिक आवर्तने

भगवान परशुराम

सोलापूर – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की आणि कार्याध्यक्ष निखिलजी लातूरकर यांनी केलेल्या नियोजनानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली. येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पौरोहित्य शाखेचे जिल्हाध्यक्ष जयंत फडके यांच्यासमवेत ब्राह्मण सेवा संघाचे संचालक वैभव कामतकर आणि तालुक्यातील ब्रह्मवृदांनी आवर्तने केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम !

जिल्हाध्यक्ष प्रमोद गोसावी, सरचिटणीस दत्ता कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष किरण करमरकर, तसेच जयवंत समुद्र, श्रीपाद कुलकर्णी, राम तडवळकर, हेमंत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, स्वाती मसलेकर, रेवती बडवे, शहराध्यक्ष संपदा जोशी यांसह अन्य कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.