दर्गाह येथे अधिक संख्येने नमाजपठणासाठी आलेल्यांना मनाई केल्याप्रकरणी धर्मांधांकडून पुजार्‍याला मारहाण

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील घटना

प्रतीकात्मक छायाचित्र

अकलूज (जिल्हा सोलापूर) – येथील विजय चौकात असलेल्या राजे बागसवार दर्गाह येथे नमाजपठणासाठी अधिक संख्येने आलेल्या लोकांना मनाई केल्यावरून जब्बार रहिमतुल्ला शेख आणि सुरज फकीर मुलाणी यांनी दर्गाहची देखरेख तसेच देवतांची पूजा करण्याचा परंपरागत मान असणारे सुनील लावंड यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. १५ मे या दिवशी ही घटना घडली. (हे आहे अल्पसंख्यांकांचे खरे स्वरुप ! – संपादक) या प्रकरणी सुनील लावंड यांनी अकलूज पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोणत्याही धार्मिक स्थळांमध्ये गर्दी करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पुजारी लावंड यांनी जब्बार शेख यांना ‘गर्दी करू नका’, असा शासनाचा आदेश असल्याचे सांगताच ‘आम्हाला अडवणारा तू कोण ?’, असे म्हणत दर्गाहमध्येच लावंड यांना सहकार्‍यांच्या साहाय्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. (अशा उद्दाम धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)