‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आजर्‍यात (जिल्हा कोल्हापूर) शेतीसह कृषीपंपांची हानी

(प्रातिनिधिक छायाचित्र)

आजरा – चक्रीवादळामुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर आले. शेतामध्ये पाणी आल्याने ऊस शेतीसह नदीकाठावरील कृषी पंप पाण्याखाली गेले आहेत. वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत. नदीकाठावरील बहुतांश गावात अशीच परिस्थिती असून ८० कृषीपंपांची हानी झाली आहे.