निधन वार्ता

सनातनच्या साधिका पुष्पा टिमकर यांचे यजमान शिरीष टिमकर (६२ वर्ष) यांचे ३ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, १ मुलगा, सून, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सनातन परिवार टिमकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

माहेश्‍वरी समाजातील डॉक्टर दांपत्याने केला लातूर येथील गोशाळेत विवाह 

शहरातील माहेश्‍वरी समाजातील डॉ. भाग्यश्री झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डॉ. सचिन चांडक यांचा विवाह येथील श्री गुरु गणेश जैन, गोशाळेत करण्यात आला. या विवाह सोहळ्यात गोशाळेत गायींना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि पंढरपूर येथे मराठा समाजाचे आंदोलन ! 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि पंढरपूर येथे मराठा समाज बांधवांनी आंदोलन केले. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

शक्य त्या सर्व मार्गांनी मराठा आरक्षणाची भरपाई देण्याचा प्रयत्न करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी आणि ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल, अशी आमची निश्‍चिती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्यशासन पुढील भूमिका निश्‍चित करील.

राज्यातील सर्वांत मोठा संघ असलेल्या गोकुळमध्ये सत्तांतर ; महाडिक गट पराभूत 

राज्यातील सर्वांत मोठा संघ असलेल्या गोकुळमध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) सत्तांतर झाले असून महाडिक गट पराभूत झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा मिळवल्या आहेत

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू येथील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.

‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठच साधकांसमोर घालून देणारे कल्याण (ठाणे) येथील पू. माधव साठे !

२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

विद्यार्थ्यांनी ज्या सुविधांचा उपयोग केला नाही, त्यांचा व्यय शुल्कामधून न्यून करावा ! – सर्वोच्च न्यायालयाचा शाळांना निर्देश

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये गेले संपूर्ण वर्षभर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू होते. बहुतांश शाळा बंदच आहेत; मात्र शाळांनी शुल्क न्यून केलेले नाही.

देहलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी 

देहलीमध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आणि कब्रस्तान येथे रांगा लागल्या आहेत. २-३ दिवस वाट पाहिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत आहे.