मिरज शहरात बंदीचा आदेश झुगारून पशूवधगृहात जनावरांची प्रतिदिन कत्तल

यावरून प्रशासन आणि पशूवधगृहचालक यांच्याकाहीरी साटेलोटे आहे, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?

कोरोनामुळे मृत पावलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य

कोरोनामुळे मृत झालेल्या २६ पत्रकारांच्या कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली.

पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद !

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने येथील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६५ किलोमीटर रस्ता एका दिवसात निर्माण करत विश्‍वविक्रम केला आहे.

पाचगणी (जिल्हा सातारा) येथे मुंबईच्या पर्यटकांवर कारवाई

नियम मोडणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी. केवळ दंडाची कारवाई केल्याने नागरिकांवर वचक बसत नाही.

महापालिकेच्या अनुमतीविना रस्त्याचे खोदकाम केल्याने आस्थापनावर गुन्हा नोंद !

हा आस्थापनाचा मनमानी कारभार आहे कि महापालिकेतील कुणा अधिकार्‍यांचा पाठिंबा आहे ? हेही शोधले पाहिजे !

कोरोना महामारीतही पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?

लहान मुलांना स्थानिक प्रशासनासह महिला आणि बाल कल्याण विभागाने विनामूल्य मास्क द्यावेत ! – महेश गावडे, अध्यक्ष, समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था

लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांना विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३३ जणांचे रक्तदान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ सांगली वेल्फेअर असोसिएशन’, यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

कोल्हापूर पोलिसांच्या ‘मिशन संवेदना’ उपक्रमाचा गरजूंना आधार !

दळवळण बंदी असल्याने रोजंदारीवर काम करणार्‍यांच्या साहाय्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘मिशन संवेदना’ नावाचा उपक्रम चालू केला.

कराडमध्ये ८ सहस्रांहून अधिक इमारतींवर सौरऊर्जा संयंत्र !

कराड नगरपालिकेच्या वतीने नुकतेच ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये शहरातील ८ सहस्रांहून अधिक इमारतींवर सौरऊर्जा संयंत्र उपयोगात आणले असल्याचे पुढे आले आहे.