कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याने अशा हत्या चालूच आहेत आणि पुढेही चालूच राहिल्या, तर आश्‍चर्य वाटू नये !

कुचबिहार (बंगाल) – येथील सिताई भागामध्ये भाजपचे कार्यकते अनिल बर्मन यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडला. रात्री बर्मन घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता घराजवळील जंगलात त्यांचा अशा स्थितीत मृतदेह आढळून आला. बर्मन यांची हत्या तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर बर्मन यांच्या घरावर आक्रमण करून तोडफोडही करण्यात आली होती. तृणमूल काँग्रेसने भाजपचा आरोप फेटाळला आहे. तृणमूलने म्हटले आहे की, अनिल बर्मन यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे.