सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सांगली, ३१ मे – सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल करण्यात आली आहे. १ जूनपासून सर्व किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध-दुग्ध पदार्थ, मिठाई, यांसह सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. या दुकानांमधून घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत देण्यास मुभा देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, फळमार्केट येथील व्यवहार, जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंडई सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.