हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बारामती येथील विवाहितेची आत्महत्या

हुंडाबंदी कायदा असतांना अशा घटना घडणे दुर्दैवी आहे ! हे रोखण्यासाठी कायद्याची कठोर कार्यवाही करून दोषींना त्वरित शिक्षा व्हायला हवी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बारामती (पुणे) – विवाहात सोने कमी दिल्याच्या कारणास्तव, तसेच विवाहानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी पतीकडून होणार्‍या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून सांगवीतील गीतांजली तावरे या विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाइकांनी विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार केले.

विवाहितेला उपचारासाठी पुण्याला ‘के.ई.एम्.’ रुग्णालयात नेण्यात आले; परंतु २७ मे या दिवशी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती, सासू-सासरे, २ नणंदा यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी कारवाई चालू आहे.