१८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्येच होणार ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

१ मे पासून चालू होणार्‍या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांमध्येच होणार आहे. लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. 

संभाजीनगर येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला !

येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या प्रकरणी ३ कर्मचार्‍यांना ‘हातात नोटीस पडताच उत्तर द्या’, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस २७ एप्रिल या दिवशी बजावली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

धार येथील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरतांना झालेल्या स्फोटात ६ जण घायाळ

येथील पीथमपूर सेक्टर ३ मधील रानीका इंडस्ट्री लिमिटेडच्या प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरतांना झालेल्या स्फोटात ६ कर्मचारी घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

गडचिरोली येथे चकमकीत पोलिसांकडून २ नक्षलवादी ठार

जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात २८ एप्रिलच्या पहाटे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.

हिंदु संस्कृतीत सांगितलेले अग्निसंस्काराचे महत्त्व जाणा !

कोरोनामुळे वाढत्या मृत्यूंच्या पार्श्‍वभूमीवर पारशी पंथियांनी आता मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी लोकांमध्ये मृतदेह गिधाडांसाठी उघड्यावर सोडले जातात.

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू !

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर २७ एप्रिलच्या मध्यरात्री ३ वाजून ४० मिनिटांनी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

 भारतातील कोविड चाचणी विश्‍वासार्ह नाही ! – ऑस्ट्रेलिया

 भारतात होणार्‍या कोरोना चाचणीत त्रुटी असावी अथवा विश्‍वास करण्याजोगी नसावी, असे पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप केले असून त्याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप केले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे आणि औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्‍चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत.

नवीन लसीकरण केंद्रांसाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव ! – उदयनराजे भोसले

केंद्रशासनाच्या वतीने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना विनामूल्य लसीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्येचा विचार करता शहरातील सदरबझार, दगडी शाळा आणि शाहूपुरी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याविषयी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.