संभाजीनगर येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला !

महापालिकेच्या ३ कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा !

कोरोनाच्या संकट काळात महापालिकेच्या कोविड केंद्रात भोंगळ कारभार चालूच !

रेमडेसिविर इंजेक्शन

संभाजीनगर – येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या प्रकरणी ३ कर्मचार्‍यांना ‘हातात नोटीस पडताच उत्तर द्या’, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस २७ एप्रिल या दिवशी बजावली आहे.

२ दिवसांपूर्वी ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’साठी इंजेक्शनची ३ खोकी देण्यात आली होती. त्याची रितसर नोंद करून ते आरोग्य कर्मचार्‍यांच्या कह्यात देण्यात आले; पण त्यापैकी २ खोकी ‘मेल्ट्रॉन’ येथे पोचली. २४ घंट्यांत झालेल्या पडताळणीत १ खोका हरवल्याचे उघड झाले. संबंधित अधिकार्‍यांनी तातडीने पांडेय यांना माहिती दिली. तेव्हा पांडेय यांनी नोटीस बजावली.