गडचिरोली येथे चकमकीत पोलिसांकडून २ नक्षलवादी ठार

प्रतिकात्मक चित्र

गडचिरोली – जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात २८ एप्रिलच्या पहाटे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांकडून अजूनही जंगल परिसरात शोधमोहीम चालू आहे. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस ठाण्यावर २७ एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता.