भारतातून चाचणी करून गेलेले भारतीय सापडले कोरोनाबाधित !
याविषयी सत्य जाणून भारताच्या प्रशासनाने सत्य समोर आणणे आवश्यक !
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून कोरोना चाचणी करून येणार्यांची पुन्हा चाचणी केल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतात होणार्या कोरोना चाचणीत त्रुटी असावी अथवा विश्वास करण्याजोगी नसावी, असे पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले आहे.
मॅक्गोवन यांनी सांगितले की, भारतातील या कोरोना चाचणी अहवालामुळे आमच्या राज्यात समस्या निर्माण होत आहेत. पर्थ येथील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या ४ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले.