नवीन लसीकरण केंद्रांसाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव ! – उदयनराजे भोसले

केंद्रशासनाच्या वतीने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना विनामूल्य लसीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्येचा विचार करता शहरातील सदरबझार, दगडी शाळा आणि शाहूपुरी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याविषयी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करायला हवा ! – महंत संतदास महाराज, भिलवाडा

कुंभमध्ये अनेक संन्यासी असूनही त्यांना पैसा महत्त्वाचा वाटतो. देश, धर्म आणि समाज यांच्या प्रती स्वतःचे दायित्व ते विसरत आहेत. गृहस्थीही स्वतःचे दायित्व विसरून पश्‍चिमी संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत.

कोरोनाच्या काळात पत्रकारांच्या रक्षणाचे दायित्व कुणाचे ?

महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या ९ मासांत कोरोनामुळे १०६ पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. याच काळात १ सहस्र ५०० हून अधिक पत्रकार कोरोनाबाधित झाले असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

३ तपांचे (३६ वर्षांचे) वैवाहिक जीवन व्यतीत करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेद्वारे स्वतःत पालट घडवून दृढ श्रद्धेने आध्यात्मिक वाटचाल करणारे रामनाथी आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शाम आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. क्षिप्रा देशमुख !

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख आणि त्यांची कन्या कु. निधी देशमुख यांना जाणवलेले आई-वडिलांमधील पालट पुढे दिले आहेत….

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवापूर्वी त्यांच्या साधकांप्रतीच्या प्रीतीचे स्मरण होऊन त्यांच्या चरणी कवितारूपी मनःपुष्पे वाहिल्याने शब्दातीत अवस्था अनुभवणे

जन्मोत्सव अनुभवला अंतरी या क्षणा ।
गुरुवर बैसिले हृदयी या अमृतक्षणा ॥ १ ॥

हास्यास्पद साम्यवाद !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना आणि साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये आपण २८ एप्रिल या दिवशी पाहिली आज या लेखातील उर्वरित सूत्रे पाहूया.

मुलांवर चांगले संस्कार करून पूर्ण वेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या आणि मुलांना मोक्षदायी गुरुचरणांशी पोचवणार्‍या श्रीमती संध्या बधाले !

आम्ही साधना करून जे समाधान, आनंद, प्रेम आणि भगवंताप्रती भाव-भक्ती अनुभवत आहोत, ते कदाचित् आम्हाला व्यवहारात कधीच मिळाले नसते. आईने दूरदृष्टीने विचार केला; म्हणूनच आम्ही साधना करण्यासाठी आश्रमात आलो. ही आमच्यावर गुरूंची मोठी कृपा आहे…..

साधना आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे प्रत्येक प्रसंगाला स्थिरतेने सामोरे जाणार्‍या डोंबिवली, ठाणे येथील कै. सौ. प्रतिमा प्रकाश राऊत (वय ५० वर्षे) !

सनातन संस्थेच्या डोंबिवली येथील साधिका सौ. प्रतिमा प्रकाश राऊत (वय ५० वर्षे) यांचे निधन झाले. त्या निमित्ताने त्यांचे यजमान श्री. प्रकाश राऊत यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.