देहलीत स्मशानभूमीमध्ये जागा नसल्याने वाहनतळाच्या भूमीवर १५ जणांचे अंत्यसंस्कार

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २ लाख ६१ सहस्र ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १ सहस्र ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहडोल (मध्यप्रदेश) येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू !

सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

महंतांना सुरक्षा द्या !

उत्तरप्रदेशातील डासना येथील महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्याविषयी अतिशय चिथावणीखोर लिखाण आणि माहिती धर्मांधांकडून विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत आहे.

चीनच्या चहाड्या !

सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी ‘चीनने सैन्य मागे घेतले असले, तरी सीमेवरील तणाव कायम आहे’, असे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आता आला. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे. चीनने यापूर्वीही अनेक वेळा कराराचे उल्लंघन केले आहे.

संचारबंदीचा कालावधी संपल्यावर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१ मेनंतर राज्यात कोरोनाची परिस्थिती काय असेल, त्यावर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास ती वाढवली जाईल, असे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ एप्रिल या दिवशी येथे केले.

जळगाव येथील रुग्णालयातून कोरोनाबाधित मृतदेह चादरीत गुंडाळून नातेवाइकांच्या कह्यात !

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह स्वतंत्र प्लास्टिक पिशवीत (बॉडी रॅपिंग बॅग) नातेवाइकांच्या कह्यात देणे बंधनकारक असतांना १६ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील साधना रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण चादरीत गुंडाळून नातेवाइकांच्या कह्यात देण्यात आला.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रकांची (‘फोटो कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांना अडकवणार्‍या अधिकार्‍यांची सीबीआय चौकशी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नंबी नारायणन् यांच्यावर क्रायोजेनिक इंजिनच्या संदर्भातील माहिती विदेशांना पुरवल्याचा खोटा आरोप करून त्यांना अटक करून त्यांचा छळ करण्यात आला होता.

संपूर्ण देहलीत आता केवळ १०० पेक्षा अल्प आयसीयू खाटा उपलब्ध ! – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

गेल्या २४ घंट्यांमध्ये देहलीमध्ये २४ सहस्रांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. यावरून कोरोनाचा संसर्ग किती गतीने वाढत आहे, याचा अंदाज येत आहे. देहलीमध्ये रुग्ण सापडण्याचा दर वाढून ३० टक्के झाला आहे. एका दिवसापूर्वी तो २४ टक्के इतका होता.