कोरोनाचा वाढता प्रभाव !
नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २ लाख ६१ सहस्र ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १ सहस्र ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यूंमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर वाहनतळामधील भूमीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. देहलीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे चित्र पहायला मिळाले आहे. येथे आतापर्यंत १५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.