वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत. त्याचप्रमाणे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचेही छायाचित्रीकरण केले जात आहेे. हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.
आतापर्यंत या संशोधन कार्यासाठी हितचिंतकांनी उपलब्ध करून दिलेल्या उपकरणांचा वापर करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संग्रह होऊ शकला. यापुढेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण आणि छायाचित्रण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरेल ! त्या दृष्टीने पुढील नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी बाजूच्या सारणीत दिल्याप्रमाणे साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ या नावाने काढावा.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (४.४.२०२१)