कोल्हापुरात दळणवळण बंदी नाही; मात्र कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी ! – सतेज पाटील, पालकमंत्री

दळणवळण बंदी कोणत्याही घटकाला परवडणारे नसल्याने कोल्हापुरात दळवळण बंदी करण्यात येणार नाही; मात्र कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

वाढे फाटा परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ !

वाढे फाटा ते वेण्णा नदी पूल या अंतरामध्ये लुटमारीच्या घटना वाढत आहेत. १९ मार्चच्या रात्री संतोष उबाळे यांना ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून भ्रमणभाष, रोख रक्कम आणि पॅन्ट काढून घेतली.

पाचगणी (जिल्हा सातारा) येथे रुग्णवाहिकेची ४ वाहनांना जोरदार धडक 

रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका पाचगणी येथे येत होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहनतळावर लावलेल्या गाड्यांना रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली

होळीच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श होलिकोत्सव साजरा करा !’ मोहीम

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या माध्यमातून धर्मवीर बलीदान मासानिमित्त प्रतिदिन श्रीशिव-शंभू मानवंदना उपक्रम !

मानवंदना ११ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत नियमितपणे देण्यात येणार आहे. पुढे पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथींना असाच क्रम चालू असणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

सर्वविनाशी दारू ! 

राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्‍या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्‍या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !

सचिन वाझे यांच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज करणार !

वाझे यांच्या विरोधात काही महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात जबाब देण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कह्यात घेण्यासाठी आम्ही २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील उद्योजकांसाठी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये उद्योजकांचा कृतीशील सहभाग !

कोविड-१९ च्या कालावधीमध्ये समाजातील अनेकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रम घेण्यात आले. त्यात धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले.

१ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयअसणार्‍या सर्व नागरिकांना लस मिळणार !

जावडेकर म्हणाले की, देशात आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ४ कोटींपेक्षा अशा व्यक्ती आहेत, ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोरोना महामारीच्या संकटात मागील १ वर्ष अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यात मर्यादा येत होत्या; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांद्वारे धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले.